Lok Sabha Election 2024 : बीड लोकसभा लढवणार नाही! ज्योती मेटे यांची माघार

Lok Sabha Election 2024 : बीड लोकसभा लढवणार नाही! ज्योती मेटे यांची माघार

बीड लोकसभा निवडणूक मी लढवावी अशी जनतेची इच्छा होती. परंतु व्यापक जनहिताचा विचार करून ही निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेऊन बीड लोकसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याचे शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी जाहीर केले.

बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली. मात्र महाविकास आघाडीची उमेदवारी बजरंग सोनवणे यांना जाहीर झाली. त्यामुळे ज्योती मेटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यापक जनहित लक्षात घेऊन आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, आपला पाठिंबा कोणाला असेल, हे राज्यपातळीवर शिवसंग्रामच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून ठरवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;