दिल्लीत तीन मजली घर कोसळले; व्हिडीओ व्हायरल

दिल्लीत तीन मजली घर कोसळले; व्हिडीओ व्हायरल

दिल्लीमध्ये शनिवारी एक तीन मजली घर कोसळल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील कल्याणपुरी भागातील 70 फूट उंच तीन मजली घर अचानक पत्त्यांसारखे कोसळले.

मात्र या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तेथील परिसरात नाल्यांचे खोदकाम सुरू होते. हे खोदकाम सुरु असताना त्या तीन मजली घराला तडे गेले होते. त्यानंतर ही इमारत शनिवारी कोसळली. सुदैवाने त्यात कुणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यावर लगेचच अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या काही घरांचेही नुकसान झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;