मुलीची हत्या लव्ह जिहादमुळे झाली, काँग्रेस नेत्याचा आरोप

मुलीची हत्या लव्ह जिहादमुळे झाली, काँग्रेस नेत्याचा आरोप

आपल्या मुलीची हत्या ही लव्ह जिहादमुळे झाल्याचा आरोप एका काँग्रेस नेत्याने केला आहे. हुबळी येथील महाविद्यालयात या तरुणीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दरम्यान, तिच्या वडिलांनी लव्ह जिहाद हेच आपल्या मुलीच्या हत्येला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

या तरुणीचं नाव नेहा हिरेमठ असं आहे. ती हुबळीच्या महाविद्यालयात मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या वर्गातील फैयाज खोंडुनायक नावाच्या विद्यार्थ्याने तिच्यावर चाकूचे सात वार करून तिची हत्या केली. आपले आणि नेहाचे प्रेमसंबंध होते, पण गेल्या काही काळापासून नेहा आपल्याला टाळत होती, असा जबाब फैयाज याने पोलिसांना दिला आहे.

नेहाच्या मृत्युनंतर राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. दरम्यान, नेहा हिचे वडील आणि काँग्रेसचे आमदार निरंजन हिरेमठ यांनी हा लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला आहे. फैयाजला माझ्या मुलीला यात अडकवायचं होतं. दीर्घ काळ त्याने यासाठी कारस्थानं केली होती. तिला अडकवण्याचं कारस्थान यशस्वी झालं नाही तर तिला संपवण्याचाही त्याचा हेतू होता. तो तिला धमकी देत होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या मुलीसोबत जे झालं ते साऱ्या देशाने पाहिलं. यात माझं वैयक्तिक प्रकरण येत नाही, कारण आरोपी माझा नातेवाईक नाही, असं हिरेमठ म्हणाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;