ईडीच्या कारवाईनंतर राज कुंद्रा याची लक्षवेधी पोस्ट, जप्ती टाळण्यासाठी लढवली अशी शक्कल?

ईडीच्या कारवाईनंतर राज कुंद्रा याची लक्षवेधी पोस्ट, जप्ती टाळण्यासाठी लढवली अशी शक्कल?

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने राज याची 97.79 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये जुहू येथील बंगल्याचा देखील समावेश आहे. महत्त्वाची गोष्टी म्हणजे, राज कुंद्रा याच्या संपत्तीमधील काही संपत्ती शिल्पा शेट्टी हिच्या नावावर देखील आहे. ईडीने कुंद्रा कुटुंबियांची संपत्ती जप्त केल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. यावर शिल्पा आणि राज यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण दोघे सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

शिल्पा हिने साई बाबा यांचा फोटो पोस्ट करत सरेंडर असं लिहिलं होतं. अभिनेत्रीने सरेंडर लिहिल्यामुळे शिल्पा हिला नक्की काय सांगायचं आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला. आता राज कुंद्रा याने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. राज याच्या लक्षवेधी पोस्टनंतर नेटकरी देखील हैराण झाले आहेत. सध्या सर्वत्र राज याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

राज कुंद्रा पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘एक योग्य व्यक्ती होण्याची एक वेळ असते.. आणि आता अती होत आहे असं सांगण्याची वेळ आली आहे…’ याआधी देखील राज याने पोस्ट शेअर केली होती. ‘जेव्हा तुम्हाला अपमानित वाटत असतं, तेव्हा शांत राहायला शिकणं ही वेगळ्या प्रकारची प्रगती आहे…’ सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत शिल्पा – राज यांना काय सांगायचं आहे, ही गोष्ट त्यांनाच माहिती…

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी लढवली अशी शक्कल?

राज कुंद्रा याने 80 कोटींचा फ्लॅट फक्त 38 कोटीत पत्नी शिल्पा शेट्टी हिला विकल्याची माहिती ईडीने दिली आहे. 2022 मध्ये राज कुंद्रा याने जुहुतील फ्लॅटची केली होती विक्री.जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था केली जात असल्याचं ईडीच म्हणणं आहे.

ईडीने नुकताच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची 98 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. राज कुंद्रा याला बीटकॉइनमधून 285 बीटकॉइनचा फायदा झाल्याचा ईडीचा दावा आहे. या बीटकॉइनची किंमत 150 कोटी इतकी आहे. राज कुंद्रा याची आणखी काही मालमत्ता असण्याची शक्यता आहे. तसेच शिल्पा शेट्टी हिचे देखील स्टेटमेंट रेकॉर्ड केले जाण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;