उन्हाच्या तडाख्यातही मतदानात तीन टक्क्यांची वाढ; चंद्रपूर मतदारसंघात 67.57 टक्के मतदान

उन्हाच्या तडाख्यातही मतदानात तीन टक्क्यांची वाढ; चंद्रपूर मतदारसंघात 67.57 टक्के मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57 टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.

राजूरा विधानसभा मतदार संघात 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णि विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी 6 लक्ष 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लक्ष 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लक्ष 41 हजार 952 (67.57 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;