मुंबईतील नाले होणार बंदिस्त; कचरा फेकण्यावर निर्बंध आणण्यासाठी उपाय

मुंबईतील नाले होणार बंदिस्त; कचरा फेकण्यावर निर्बंध आणण्यासाठी उपाय

मुंबईतील महत्त्वाचे नाले आता मजबूत प्लॅस्टिक आवरण, लोखंडी जाळय़ांनी बंदिस्त करण्यात येणार आहेत. नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमात वांद्रे पूर्वसह इतर काही ठिकाणी करण्यात आलेला प्रयोग यशस्वी करण्यात आल्यामुळे मुंबईभरात हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये पावसाळय़ात नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये यासाठी व्यापक प्रमाणात नालेसफाई करण्यात येते, मात्र मार्चपासून नालेसफाई झाल्यामुळे पावसाळय़ापूर्वी मोठय़ा प्रमाणात या नाल्यांमध्ये गाळ साचतो. यामध्ये रहिवाशांकडून नाल्यात टाकण्यात येणाऱया कचऱयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे नालेसफाई झाल्यानंतरही नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. याला आळा घालण्यासाठी नाल्यात कचरा टाकताना आढळल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर आता हे नाले बंदिस्त करून नाल्यात टाकण्यात येणाऱया कचऱयाला आळा घालण्यात येणार आहे.

 

वांद्रय़ातील प्रयोग यशस्वी

वांद्रे येथील पी अॅण्ड टी कॉलनी नाल्याशेजारी 10 फूट उंच जाळय़ा बसविण्यात आल्या होत्या. या ठिकाणी जाळय़ा बसविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून अन्य ठिकाणी नाल्याशेजारी जाळय़ा बसवण्यात येतील. तसेच नाल्याशेजारी कचरा फेकणाऱयांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा निर्णयही घेण्यात आला आहे.

 

मुंबईतील नाले

छोटे नाले          1508 (लांबी 605 किमी)

मोठे नाले          309 (लांबी 290 किमी)

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;