महाविकास आघाडीचा निर्धार ईशान्य मुंबईतून भाजपा तडीपार!

महाविकास आघाडीचा निर्धार ईशान्य मुंबईतून भाजपा तडीपार!

ईशान्य मुंबईतून भारतीय जनता पक्षाला तडीपार करण्याचा एकमुखी निर्धार घाटकोपर येथे आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात करण्यात आला. यंदाची निवडणूक ही भाजपाला तडीपार करण्याची सुवर्णसंधी असून मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवून शिवसेना उमेदवार संजय दिना पाटील यांना दिल्लीत पाठवूया, अशी गर्जनाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. शिवसेना उपनेते सचिन अहिर, काँग्रेस नेते भाई जगताप, नसीम खान, वीरेंद्र बक्षी, चरणसिंग सप्रा, राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मिलिंद सुर्वे आदींनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यांनी महागाई, जुमलेबाजी, हुकूमशाही, संविधान आदी प्रमुख मुद्दय़ांवरून भाजपावर जोरदार हल्ला चढवला. याप्रसंगी शिवसेना आमदार सुनील राऊत, उपनेते दत्ता दळवी, आमदार-विभागप्रमुख रमेश कोरगावकर, विभागप्रमुख तुकाराम पाटील, महिला विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकर, प्रज्ञा सकपाळ आदी उपस्थित होते.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;