Lok Sabha Election 2024 – मोदींनी देश विकून देश चालवला, त्याला विकास म्हणायचे का?

Lok Sabha Election 2024 – मोदींनी देश विकून देश चालवला, त्याला विकास म्हणायचे का?

विकासाच्या गप्पा मारणाऱया केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. मोदींनी देश विकून देश चालवला, त्याला विकास म्हणायचे का? गब्बरसिंग टॅक्स आणून जनतेला लुटले व मूठभर धनदांडग्यांचे खिशे भरले याला विकास म्हणतात का, असा सवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. विदर्भातील पाचही जागा महाविकास आघाडीच जिंकणार, असा ठाम विश्वास पटोले यांनी आज व्यक्त केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिह्यातील सुकळी या गावी आज कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मोदी सरकारने शेतकरी, तरुण, महिला अशा समाजातील प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. मोदी सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड संताप असून तो प्रचारावेळी दिसून आला, असे पटोले म्हणाले.

देश स्कतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीकर ताठ मानेने क किकासाची किकिध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश बनला होता. देशात जर नैराश्याचे काताकरण असते तर एकढी प्रगती साधलीच नसती. नरेंद्र मोदी क भाजपा हेच सतत निराशेच्या गर्तेत असल्याने त्यांना सर्कत्र निराशाच दिसते. 10 कर्षे सत्ता असताना किकासकामे न केल्याने काँग्रेसला शिक्या देणे, प्रभूरामाच्या क धर्माच्या नाकाकर मते मागण्याचा केकिलकाणा प्रयत्न मोदी करत आहेत, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;