पुनिया, सुजीतला पात्र फेरी स्पर्धा हुकली

 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

किर्गीजस्तानमध्ये बिश्केक येथे सुरू असलेल्या पॅरीस ऑलिम्पिकसाठीच्या शेवटची आशियाई पात्र फेरी कुस्ती स्पर्धा भारताचे मल्ल दीपक पुनिया आणि सुजीत कलाकल यांना हुकली आहे. या स्पर्धेसाठी ते ाकिर्गीजस्तानला रवाना झाले होते पण दुबईमध्ये खराब हवामानामुळे त्यांचे विमान किर्गीजस्तानच्या राजधानीत उशिरा पोहोचले. दुबईमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने विमानतळावर पाणी साचले होते. त्यामुळे हवाई उ•ाण थांबविण्यात आले होते. पुनिया आणि सुजीत बिश्केक येथे पोहोचण्यापूर्वी स्पर्धेला प्रारंभ झाला होता. दरम्यान भारतीय मल्लांच्या प्रशिक्षकांनी स्पर्धा आयोजकांकडे झालेल्या समस्येची माहिती देऊन त्यांना संधी द्यावी, अशी विनंती केली. पण स्पर्धा आयोजकांनी ती फेटाळल्याने पुनिया आणि सुजीत यांना ही पात्र फेरीची स्पर्धा पुर्णपणे हुकली आहे. आता पॅरीस ऑलिम्पिकसाठी शेवटची पात्र फेरीची स्पर्धा मे महिन्यात तुर्की येथे होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या या दोन्ही मल्लांना आपल्या पात्रतेसाठी शेवटची संधी राहिल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;