‘मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका’
बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही, असा टोमणा भारतीय जनता पक्षाच्या बीडमधील उमेदवार पंकजा मुंडे यांनी मारला होता. त्याला मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिले. तुमच्या वाटेला मी गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका, असा इशारा जरांगे यांनी दिला.
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात वरील वक्तव्य केले होते. ‘विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिला आहे,’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मी ऐकलले नाही. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, त्यांच्या समाजालाही नाही, असे जरांगे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List