ओडीशातील महानदीत बोट उलटली, दोघांचा मृत्यू सात बेपत्ता

ओडीशातील महानदीत बोट उलटली, दोघांचा मृत्यू सात बेपत्ता

ओडिशाच्या झारसुगुडा लखनपूर ब्लॉकजवळ महानदीमध्ये एक बोट बुडाली असून या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर सात जण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथक घटनास्थळी पोहोचलेले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

बरगड जिल्ह्यातील बांधीपाली भागातील काही मुले आणि महिलांसह सुमारे 50 लोक बोटीवर होते. हे सर्व लोक फिरायला गेले होते. या घटनेनंतर राज्यातील महानदीतील बोट वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही बोट प्रवासी घेऊन महानदीतून जात असताना लखनपूर ब्लॉकखालील शारदाजवळ बोट उलटली. नदीत पडलेले लोक जीव वाचवण्यासाठी ओरडत होते. ही घटना लक्षात येताच तेथे उपस्थित मच्छिमारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बोटी नदीत नेल्या आणि एकामागून एक लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मच्छिमारांनी सर्व प्रवाशांना वाचवले मात्र अजून सात जण सध्या बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;