अखेर आमिर खानसोबतच्या घटस्फोटावर किरण राव म्हणाली, आम्हाला आमच्या नात्याची..

अखेर आमिर खानसोबतच्या घटस्फोटावर किरण राव म्हणाली, आम्हाला आमच्या नात्याची..

आमिर खान आणि किरण राव याच्या घटस्फोट होऊन आता काही वर्षे उलटली आहेत. मात्र, आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, यावर कधीच या दोघांनी भाष्य केले नाही. घटस्फोट झाल्यानंतरही आमिर खान आणि किरण राव एकाच इमारतीमध्ये राहतात, हेच नाही तर जेवणही एकसोबतच करतात. घटस्फोटानंतर दोघांनी एकाच चित्रपटात काम केले. अनेकदा विदेशात मुलासोबत आमिर खान आणि किरण राव फिरताना देखील दिसतात. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आमिर खान आणि किरण राव दिसले.

आता नुकताच किरण राव हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही अत्यंत मोठे खुलासे करताना किरण राव ही दिसलीये. हेच नाही तर किरण राव आपल्या आणि आमिर खानच्या घटस्फोटाबद्दल बोलताना देखील दिसलीये. किरण राव हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. बिनधास्तपणे बोलताना किरण राव दिसली आहे.

किरण राव म्हणाली की, ही प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू होती. आम्हाला आमच्या रिलेशनची जी स्थिती होती ती बदलायची होती. हेच नाही तर आम्हाला हे देखील माहिती होते की, आमचा एक मुलगा आहे आणि या गोष्टींचा त्याच्यावर काहीच परिणाम होऊ नये, अशी आमच्या दोघांचाही इच्छा होती, त्यासाठी आम्ही काळजी घेतली.

पुढे किरण राव ही म्हणाली की, मी आणि आमिर खानने आमच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी समुपदेशन देखील केले. मुळात म्हणजे लोकांचे घटस्फोट हे खूप जास्त वेगळे असतात. बऱ्याच लोकांना वाटते की, आपण एका चुकीच्या व्यक्तीसोबत इतके वर्षे घालवले. राग देखील आपल्याला येतो. बऱ्याच वेळा लोक आपल्या स्वत:चाच तिरस्कार देखील करतात.

किरण राव म्हणाली की, एखाद्या व्यक्तीला त्याच्या दोषांसह स्वीकारले पाहिजे. आपण समान मालकी घेतली पाहिजे आणि हेच नाही तर विवाहात पती पत्नी दोघांनाही जबाबदार धरले पाहिजे. आता किरण राव हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. किरण राव ही तिच्या लापता लेडीज या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद देखील दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;