मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या लेकाची फीस ऐकून बसेल मोठा धक्का, एका वर्षाला कोट्यवधी..

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या लेकाची फीस ऐकून बसेल मोठा धक्का, एका वर्षाला कोट्यवधी..

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अरहान खान सध्या तूफान चर्चेत आहे. अरहान खान हा दम बिरयानी पॉडकास्टमधून मोठे खुलासे करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच अरहान खान याच्या या शोमध्ये वडील अरबाज खान, काका सोहेल खान पोहचले होते. हेच नाही तर आई मलायका अरोरा देखील अरहान खानच्या शोमध्ये पोहचली. यावेळी काही मोठे खुलासे करण्यात आले. पहिल्यांदाच मलायका अरोरा ही असे जाहिरपणे आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसली. हेच नाही तर अरबाज खान हा थेट घटस्फोटाबद्दल बोलताना देखील दिसला.

अरहान खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याचे सांगितले जातंय. अरहान खान हा सध्या उच्च शिक्षण विदेशात घेतोय. वडील अरबाज खान यांच्या लग्नात धमाल करतानाही अरहान खान हा दिसला. शूरा खान आणि अरहान खान यांचे देखील चांगले रिलेशन आहे. वडील अरबाज खान, सावत्र आई शूरा खान यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच जेवणासाठी अरहान खान गेला होता.

अरहान खान हा लाँग आयलँड विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहे. अरहान खान हा चित्रपटाशी संबंधित विषयात शिक्षण घेत आहे. रिपोर्टनुसार अरहान खान हा शिक्षण घेत असलेल्या कोर्सची फीस ही 1.2 कोटी आहे. म्हणजेच काय तर मलायका अरोरा आणि अरबाज खान हे लेकाच्या शिक्षणासाठी कोट्यवधी रूपये खर्च करतात. अनेकदा मुलाला विमानतळावर सोडण्यासाठी मलायका आणि अरबाज एकत्र येतात.

अरहान खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे स्पष्ट आहे. बाॅलिवूडमध्ये काम करण्याचे अरहान खान याचे स्वप्न आहे. हेच नाही तर सलमान खान हाच अरहान खान याला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार असल्याची चर्चा आहे. अरहान खान हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतोय. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अरहान दिसतो.

अरहान खान हा त्याच्या शोमध्ये मोठे खुलासे करताना दिसतोय. आता आई वडील आणि काकानंतर अरहान खानच्या शोमध्ये गेस्ट म्हणून कोण येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे देखील बघायला मिळत आहे. अरहान खान हा काही दिवसांपूर्वीच विदेशात मलायका अरोरा आणि ओरीसोबत धमाल करताना दिसला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना देखील दिसले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;