नागपुरात मतदार चिठ्ठीतून भाजपचा धडधडीत प्रचार; काँग्रेसकडून कारवाईची मागणी

नागपुरात मतदार चिठ्ठीतून भाजपचा धडधडीत प्रचार; काँग्रेसकडून कारवाईची मागणी

लोकशाहीचा उत्सव म्हणजेच Lok Sabha Election 2024 साठी मतदानाचा पहिला टप्पा आज पार पडत आहे. यावेळी मतदारांनी चांगला उत्साह दाखवत आपला हक्क बजावण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्रातील विदर्भात आज मतदान होत आहे. असं असताना अनेक मतदारांची नावं गहाळ झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे नाराजी होती. तर काही ठिकाणी सर्रास भाजपचा प्रचार सुरू असल्याचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघड केलं.

X या सोशल मीडिया साइटवर काँग्रेसने फोटो आणि पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ‘नागपूरच्या पूर्व आणि मध्य भागात भाजपने जवळपास 2 हजार मशीनच्या माध्यमातून नितीन गडकरी आणि भाजपचा लोगो असणारी चिठ्ठी दिली जात आहे. ‘कहो दिल से नितीनजी फिरसे’ असही या चिठ्ठीत लिहीलं आहे. हे नियमात बसत नसल्याने निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;