अर्जुनराम मेघवाल यांच्या गाडीला वॉटर कॅम्परची धडक, सुदैवाने वाचले

अर्जुनराम मेघवाल यांच्या गाडीला वॉटर कॅम्परची धडक, सुदैवाने वाचले

राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 12 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. अशातच बीकानेरचे भाजपचे उमेदवार अर्जुन राम मेघवाल यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जिथे अर्जुनलाल मेघवाल यांच्या गाडीला वॉटर कॅम्परने भरलेल्या गाडीने धडक दिली. त्यावेळी अर्जुन राम गाडीतच होते, मात्र सुदैवाने बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मतदान झाल्यानंतर अर्जुन राम मेघवाल शहरातील वेगवेगळ्या मतदान केंद्राची पाहणी करत होते. गंगाशहरमध्ये मतदान केल्यानंतर अर्जुनराम मेघवाल बूथवर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत होते. यावेळी गंगा शहरातील वळणावर वॉटर कॅम्परने भरलेल्या बॉडी टॅक्सीने त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. यावेळी अर्जुनराम मेघवाल गाडीत होते. मात्र सुदैवाने त्यांना काही झाले नाही. या अपघातात अर्जुनराम मेघवाल यांच्या कारचे मागील भागाचे नुकसान झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;