Exclusive: काँग्रेस उमेदवारासमोर ‘कॅन्सल’चा शिक्का; चंद्रपुरातील मतदान केंद्रावर राडा
>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
Lok Sabha Election 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी एक मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत मतदान केंद्रावर राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. चंद्रपुरातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे.
मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आला आहे. ही घटना हिंदी सिटी हायस्कूल केंद्रावर घडली आहे. कॅन्सलच्या शिक्क्याचा घोळ समोर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला. मुनगंटीवार यांच्या निषेधाचे नारे लावत पक्षपात केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने केंद्रावर काहीकाळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List