डीप नेक गाऊनमध्ये रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी म्हणाले, बॉलिवूडची हवा लागली..
मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच धूमधडाक्यात पार पडला. 18 एप्रिल रोजी मुंबईतील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात हा पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने यावेळी दीप नेक गाऊन परिधान केला होता. रिंकूला पहिल्यांदाच इतक्या ग्लॅमरस अंदाजात पाहिलं गेलं.
रिंकूच्या या लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना तिचा हा लूक पसंत पडला. तर काहींनी तिच्या बोल्ड अंदाजावरून टीका केली. 'बॉलिवूडची हवा लागली वाटतं', असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.
'रिंकू या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत', असं एकाने लिहिलंय. तर 'एक सैराट काय झाला, फारच हवेत गेले', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'कम्फर्टेबल नाही म्हणून कॉन्फिडन्स पण नाही', असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List