ते दोन शब्द ऐकल्यावर मला जाणीव झाली की मी बच्चन कुटुंबाची… ऐश्वर्याच्या त्या वक्तव्याची चर्चा !

ते दोन शब्द ऐकल्यावर मला जाणीव झाली की मी बच्चन कुटुंबाची… ऐश्वर्याच्या त्या वक्तव्याची चर्चा !

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एक उत्तम ही केवळ एक सौंदर्यलतीच नव्हे तर नामवंत अभिनेत्री देखील आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने काही काळातच मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि हळूहळू भारतातील टॉप अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. तिच्या मोठ्या कारकिर्दीत ऐश्वर्याने तिने पती अभिषेक बच्चनसोबतही अनेक चित्रपट केले. 2007 मध्ये अभिषेकसोबत लग्न करून ऐश्वर्याने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. दोघांचे लग्न बरेच चर्चेत आले होते. 20 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. सध्या जरी ऐश्वर्या- अभिषेकच्या नात्याबद्दल बरीच चर्चा सुरू असली तर त्या दोघांनीही मात्र नेहमीच एकमेकांचा आदर करत नात्याबद्दल मौन राखले. याचदरम्यान ऐश्वर्याच्या एक जुना इंटरव्ह्यू व्हायरल झालाय, ज्यामध्ये तिने केलेल्या वक्तव्याची बरीच चर्चा सुरू आहे.

ते शब्द ऐकून धक्का बसला..

2007 साली ऐश्वर्या-अभिषेकचं थाटात लग्न झालं. मात्र आपण बच्चन कुटुंबाची सून आहोत, याची जाणीव कधी झाली त्याबद्दल ऐश्वर्याने एक किस्सा सांगितला होता. लग्नानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या पहिल्यांदा एकत्र फ्लाइटमध्ये प्रवास करत होते. तेव्हाच तिला ही जाणीव झाली. व्होगला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने शेअर केले होते की, बोरा बोराला त्यांच्या हनीमूनसाठी विमानात एअर होस्टेसने तिला ‘मिसेस बच्चन’ असे संबोधित केले तेव्हा क्षणभर तिला धक्का बसला.

२० एप्रिलला लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक हनीमूनसाठी बोरा बोरा येथे जात होते. फ्लाईटमध्ये चढल्यावर तेथील एका एअर होस्टेसने हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. ‘मिसेस बच्चन, तुमचं स्वागत आहे’ अस ती एअर होस्टेस ऐश्वर्याला म्हणाली. ते ऐकताच अभिषेक -ऐश्वर्याने एकमेकांकडे पाहिलं आणि ते दोघेही हसू लागले. ते दोन शब्द ऐकल्यावर मला खरी जाणीव झाली की माझं लग्न झालंय, असं ऐश्वर्याने नमूद केलं.

बच्चन कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. ऐश्वर्या आणि अभिषेक हे इंडस्ट्रीतील आदर्श जोडपं आहे. त्यांची लाडकी लेक आराध्याही खूप चर्चेत असते. ती तिच्या आईसबोत अनेक फंक्शन्सदरम्यान दिसते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;