बापाच्या पैशांवर किती दिवस..; म्हणणाऱ्याला अनिल कपूरच्या मुलाने सुनावलं
अभिनेते अनिल कपूर यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत जितकं यश मिळालं, तितकं त्यांच्या मुलांना मिळालं नाही. अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर बॉलिवूडमध्ये सक्रिय असली तरी गेल्या काही वर्षांत तिचा उल्लेखनीय असा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर यालासुद्धा प्रेक्षकांची विशेष पसंती आतापर्यंत मिळाली नाही. मात्र हर्षवर्धन सोशल मीडियावरील एका कमेंटमुळे सध्या जोरदार चर्चेत आला आहे. हर्षवर्धनने एक्सवर (ट्विटर) त्याच्या आवडत्या फुलबॉल टीमबद्दल एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टवर एका युजरने खोचक कमेंट केली. ‘कधीतरी एखादा चांगला चित्रपट कर. असं बापाच्या पैशांवर कधीपर्यंत शूज विकत घेत राहशील’, असं त्याने लिहिलंय. या युजरला प्रतिक्रिया देत हर्षवर्धनने चांगलंच सुनावलं आहे.
ट्रोलरला उत्तर देत हर्षवर्धनने लिहिलं, ‘मला तुझे चित्रपट कुठे पहायला मिळतील? तू असे किती चित्रपट केले आहेस? मी ‘रे’, ‘थार’, ‘भावेश जोशी’, ‘एके व्हर्सेस एके’, ‘मिर्झिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. तू कोण आहेस? एक फालतू लूझर, जो ट्विटरवर फक्त कटुता पसरवतोय’ हर्षवर्धनने याआधीही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. गेल्या वर्षी त्याने फुटबॉल स्टार डेव्हिड बेकहॅमसोबत फोटो शेअर केला होता. त्यावर कमेंट करत ट्रोलरने लिहिलं होतं, “त्याने तुला विचारलं नाही का, की तू कोण आहेस?” त्यावर ट्रोलरला सुनावत हर्षवर्धनने लिहिलं, ‘भावा, तो माझ्या घरी आला होता. तू कोण आहेस?’

हर्षवर्धन कपूर हा अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांचा मुलगा आहे. तर अभिनेत्री सोनम कपूर आणि निर्माती रिया कपूर या त्याच्या बहिणी आहेत. 2016 मध्ये त्याने ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी त्याने अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ‘थार’मध्ये त्याने वडील अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List