Lok Sabha Election 2024: सचिन पायलट यांचा मोठा दावा; INDIA आघाडी पार करणार इतका मोठा आकडा

Lok Sabha Election 2024: सचिन पायलट यांचा मोठा दावा; INDIA आघाडी पार करणार इतका मोठा आकडा

#LokSabhaElection2024 च्या पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या प्रचंड उन्हात देखील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करताना पाहायला मिळत आहे. या प्रक्रियेला गालबोट लागेल अशी कोणतीही घटना आतापर्यंत समोर आलेली नाही. अशातच राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मोठा दावा केला. राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपला मागे टाकेल इतकेच नाही तर देशात INDIA आघाडी ही 272 चा बहुमताचा आकडा पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एएनआय सोबत बोलताना त्यांनी असा दावा केला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, ‘संपूर्ण देशात आणि राज्यात बदलाचे वातावरण आहे. मी जे पाहतोय त्यावरून मला वाटतं की काँग्रेसची कामगिरी पूर्वीपेक्षा खूप चांगली होईल आणि 4 जून रोजी INDIA आघाडीला बहुमत मिळेल. …200, 300, 500 जागा ओलांडण्याची हमी देण्यात काही अर्थ नाही. मी एवढेच सांगू शकतो की, राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपला मागे टाकेल. आणि देशात INDIA आघाडी 272 जागांचा बहुमताचा आकडा पार करेल. आपला देशातील नागरिक खूप हुशार आहेत’.

यापुढे बोलताना ते म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी भाजप थेट आमच्या विरोधात लढत आहे तिथे काँग्रेसचा स्ट्राइक रेट चांगला असेल…’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;