वैद्यकीय खर्चासाठी पीएफ खात्यातून आता दुप्पट रक्कम
पीएफ खात्यातून आता वैद्यकीय खर्चापोटी दुप्पट रक्कम मिळणार आहे. आधी 50 हजार रुपये काढता येत होते. आता 1 लाख रुपये काढता येणार आहेत.
ईपीएफओने वैद्यकीय कारणासाठी आगाऊ पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ईपीएफओने अलीकडेच जारी केलेल्या परिपत्रकानुसार वैद्यकीय परिस्थितीत पीएफ खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. याबाबत ईपीएफओने 16 एप्रिल रोजी परिपत्रक काढले असून त्यानुसार ऑप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्येही बदल केले आहेत. फॉर्म 31 सोबत पीएफधारकाने कर्मचारी तसेच डॉक्टर यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List