विमानतळाची सैर युटय़ूबरला भोवली
बंगळुरू ते चेन्नई प्रवास करण्याच्या बहाण्याने एअरपोर्टवर घुसखोरी करून सुरक्षेचा भंग करणाऱया विकास गौडा या यूटय़ूबरला अटक झाली. 12 एप्रिल रोजी विकासने व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड केला होता. व्हिडीओ पाहून केपेनगोवडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या सुरक्षा रक्षकांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर पूर्व विभागाचे डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, आरोपी विकास गौडा याने 7 एप्रिल रोजी बंगळुरू ते चेन्नईचे विमानाचे तिकीट बुक करून विमानतळावर प्रवेश मिळवला. मात्र तो बार्ंडग गेटकडे गेला नाही. त्याने प्रतिबंधित भागात अवैधरीत्या प्रवेश करून दृश्यांचे चित्रीकरण सुरू केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List