Lok Sabha Election 2024 Live Update : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 19.17 टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 5 जागांसह देशभरातील 102 जागांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघात मतदान होत आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लोकसभेसह अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेसाठीही आज मतदान पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेचे लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर…
- महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 19.17 टक्के मतदान
- 11 वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती मतदान?अंदमान आणि निकोबार आयलंडमध्ये 21.82 टक्के, अरुणाचल प्रदेशमध्ये 18.26 टक्के, आसाममध्ये 27.22 टक्के, बिहारमध्ये 20.42 टक्के, छत्तीसगढमध्ये 28.12 टक्के, जम्मू आणि कश्मीरमध्ये 22.60 टक्के, लक्ष्यद्वीपमध्ये 16.33 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 30.46 टक्के, महाराष्ट्रामध्ये 19.17 टक्के, मणिपूरमध्ये 27.64 टक्के, मेघालयमध्ये 31.65 टक्के, मिझोरममध्ये 26.23 टक्के, नागालँडमध्ये 22.50 टक्के, पुद्दुचेरीमध्ये 27.63 टक्के, राजस्थानमध्ये 22.51 टक्के, सिक्कीममध्ये 21.20 टक्के, तमिळनाडूमध्ये 23.72 टक्के, त्रिपुरामध्ये 33.28 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 25.20 टक्के, उत्तराखंडमध्ये 24.83 टक्के
- अरुणाचल विधानसभेसाठी 11 वाजेपर्यंत 19.46, तर सिक्कीम विधानसभेसाठी 21.20 टक्के मतदान
State Assembly elections 2024 | Arunachal Pradesh records 19.46% voter turnout till 11 am, Sikkim 21.20% pic.twitter.com/tMC6sJk7to
— ANI (@ANI) April 19, 2024
- नागपुरात 11 वाजेपर्यंत 17.53 टक्के, भंडारा-गोंदियात 19.72 टक्के, तर गडचिरोली-चिमूरमध्ये 21.82 टक्के, रामटेकमध्ये 16.14 टक्के, चंद्रपूरमध्ये 19.94 टक्के मतदान
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला

- जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे हिने नागपूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक मतदान केले

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला
- अभिनेता कमल हसन, अभिनेता विजय सेतुपती याने चेन्नईमध्ये मतदान केले
#WATCH | Tamil Nadu: Actor and MNM chief Kamal Haasan arrives at a polling booth in Koyambedu, Chennai to cast his vote.
Makkal Needhi Maiam (MNM) is not contesting the #LokSabhaElections2024, the party supported and campaigned for DMK. pic.twitter.com/q1bizg3Wey
— ANI (@ANI) April 19, 2024
- विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्नी व मुलीसह मतदानाचा हक्क बजावला
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्नी व मुलीसह मतदानाचा हक्क बजावला #LokSabhaElection2024 pic.twitter.com/PRUYfKczcA
— Saamana (@SaamanaOnline) April 19, 2024
- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान
- आधी लगीन लोकशाहीचं! बोहल्यावर चढण्यापूर्वी चंद्रपुरात नवरदेवाने केले मतदान
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List