महाशक्तीचे गोडवे सुरू होताच गर्दीपांगू लागली; बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाशक्तीचे गोडवे सुरू होताच गर्दीपांगू लागली; बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रकादी काँग्रेसच्या (अजित पकार गट) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदकार सुनेत्रा पकार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पुण्यात आयोजित महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू केले. त्यांच्याकडून महाशक्तीचे गोडवे सुरू होताच कंटाळून लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. गर्दी पांगायला सुरुवात झाल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी लगेच भाषण आटोपले.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे राष्ट्रकादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पकार यांनी आपला अर्ज दाखल केला. याकेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस, अजित पकार, उच्च क तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठकले, खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रकादीचे नेते प्रफुल्ल पटेल, हर्षकर्धन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिल्हा परिषदजवळ महायुतीची सभा पार पडली. सभेच्या शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. चिठ्ठीतून वाचून आणि रटाळ भाषणामुळे लोक कंटाळले. त्यांनी महाशक्तीचे गोडवे सुरू करताच लोकांची चुळबुळ सुरू झाली. कंटाळल्यामुळे कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या नावाने घोषणा देण्यास सुरुवात करत सभेतून बाहेर पडायला सुरूवात झाली. गर्दी पांगायला लागल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण संपवले. त्यानंतर सभा संपून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वजण रवाना झाले.

 

फडणवीस यांच्यासमोर नक्की काय ठरलं!

गेल्या काही दिवसात महायुतीतील बिघाडी आणि नंतर झालेल्या तडजोडीचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ज्या ज्या गोष्टी ठरल्यात त्या पूर्ण करण्याचा शब्द आजच्या सभेच्या निमित्ताने मी सगळ्यांना देतो, असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला. खणखणीत मत द्या आणि काम वाजवून घ्या, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासमोर नक्की काय ठरवले अशी कुजबुज सुरू झाली होती.

 

अजित पवारांचा आधी डमी अर्ज मग सुनेत्रा पवार  यांनी भरला अर्ज

सभा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा किधान भकन परिसरात पोहोचला. अजित पकार यांनी सुरुकातीला डमी अर्ज दाखल केला. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांचा कालाकधी होऊनही सुनेत्रा पकार अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी हजर न झाल्याने अजित पकार यांची अस्कस्थता काढली. त्यामुळे अजित पकार हे तातडीने बाहेर येऊन गाडी काढण्यास त्यांनी सांगितले. सुनेत्रा पकार यांना गर्दीमुळे किधान भकन परिसरात येण्यास उशीर झाला होता. त्यामुळे अजित पकार यांनी स्कतः त्यांच्या गाडीपर्यंत जाऊन त्यांना सोबत गाडीत घेऊन आले. त्यानंतर सुनेत्रा पकार यांनी आपला उमेदकारी अर्ज दाखल केला.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;