शाहू महाराजांना पाठिंब्यासाठी 17 माजी महापौर, 228 माजी नगरसेवक मैदानात!

शाहू महाराजांना पाठिंब्यासाठी 17 माजी महापौर, 228 माजी नगरसेवक मैदानात!

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना शहरातील तब्बल 17 माजी महापौर आणि 228 माजी नगरसेवकांनी पाठिंबा देत निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. देशातील हुकूमशाही कारभाराविरुद्ध कोल्हापुरातून लढाई सुरू करण्याचा एल्गारही करण्यात आला.

न्यू पॅलेस येथे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक रामचंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज माजी नगरसेवकांची बैठक झाली.

यावेळी माजी महापौर महादेव आडगुळे, रामभाऊ फाळके, आर. के. पोवार, कांचन कवाळे, भीमराव पोवार, मारुतराव कातवरे, सई खराडे, सागर चव्हाण, वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, प्रतिभा नाईकनवरे, वैशाली डकरे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, ऍड. सुरमंजिरी लाटकर, शोभा बोंद्रे, निलोफर आजरेकर यांच्यासह 228 माजी नगरसेवक उपस्थित होते. नुकतीच महायुतीने पत्रकार परिषद घेऊन संजय मंडलिक यांच्यासाठी शंभर माजी नगरसेवक पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. त्याच्यावर श्रीमंत शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसकडून डबल धमाका करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;