हिंमत असेल तर माझ्यासोबत पॉडकास्ट करा! आदित्य ठाकरे यांचे मिंधेंना आव्हान

हिंमत असेल तर माझ्यासोबत पॉडकास्ट करा! आदित्य ठाकरे यांचे मिंधेंना आव्हान

महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम प्रचारासाठी इन्फ्लुअन्सर्सशी संपर्क साधत असून हिंमत असेल तर माझ्याबरोबर वन-टू-वन पॉडकास्ट करा, असे आव्हान शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे यांना दिले.

सोशल मीडिया व अन्य क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींच्या सहवासात राहणे, त्यांना मुलाखती देणे हे सध्या प्रसिद्धीचे माध्यम बनले आहे. मॉडर्न जगात त्यांना इन्फ्लुअन्सर्स असा शब्द वापरला जातो. या इन्फ्लुअन्सर्सना भेटणे आणि विविध यूटय़ूब चॅनेल्सच्या पॉडकास्टला मुलाखती देण्याचा मार्ग सध्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी अवलंबला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रसिद्धी विभागाकडूनही तसा प्रयत्न सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या संधीसाठी शिवसेनेच्या पाठीवर वार केला, असे सांगतानाच शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुजरातला पाठवलेल्या उद्योगांवर पॉडकास्टमध्ये बोलू या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी त्यांच्या नोकरीच्या संधी का गमावल्या? राज्यात शेतकऱयांच्या आत्महत्या का वाढत आहेत? शहरी गुन्हेगारी वाढत आहे आणि महिला असुरक्षित आहेत, यावरही बोलू या असे आव्हानच त्यांनी दिले आहे. मात्र या गोष्टींवर न बोलता शिंदे हे निर्लज्जपणे त्यांच्या ठेकेदार मित्रांसाठी आपल्या पदाचा वापर करून महाराष्ट्राला लुटत आहेत, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्यापासून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे, तर दुसरीकडे दुसऱया टप्प्यातील मतदानाकरिता उमेदवारी अर्ज भरण्यासाठीही महाराष्ट्रात जोर आला आहे. याचदरम्यान प्रचारसभाही ठिकठिकाणी गाजत आहेत. त्यामुळे कोण कोणत्या हटक्या पद्धतीने प्रचार करून लोकांपर्यंत सर्वाधिक पोहोचतेय हे पाहावे लागणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर ही पोस्ट केली आहे. “महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्र्यांना होस्ट करण्यास सांगत आहेत, पण मिंधेंना माझे एक आव्हान आहे. त्यांना माझ्यासोबत वन-टू-वन पॉडकास्ट करू द्या, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;