भारतीय मल्लांचे ऑलिम्पिक पात्रतेवर लक्ष्य

वृत्तसंस्था /बिश्केक (किर्गीजस्तान)

येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोटा पद्धतीनुसार स्थान मिळविण्याकरिता येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्र फेरी स्पर्धेमध्ये भारतीय मल्लांचे लक्ष्य पॅरीस ऑलिम्पिक तिकिटावर राहिल. या स्पर्धेत महिलांच्या विभागातील विनेश फोगटच्या कामगिरीवर लक्ष राहिल. पॅरीस ऑलिम्पिकसाठी 18 विविध वजन गटातून फ्रिस्टाईल, महिला आणि ग्रीको रोमन या तीन विभागातून 36 मल्लांची निवड केली जाते. भारतीय मल्ल या पात्र फेरीच्या स्पर्धेत सर्व वजन गटातून सहभागी होत आहेत. महिलांच्या 53 किलो वजन गटामध्ये भारताची महिला मल्ल 19 वर्षीय अंतिम पांगलने यापूर्वीच पॅरीस ऑलिम्पिकचे तिकीट आरक्षित केले आहे. तिने बेलग्रेड येथे झालेल्या 2023 च्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळवून ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. आता महिलांच्या विभागात विनेश फोगट -50 किलो, रितीका हुडा -76 किलो, 23 वर्षाखालील वयोगटातील विद्यमान विश्वविजेती मल्ल अंशू -57 किलो, मानसी -62 किलो आणि निशा -68 किलो वजन गटातून या पात्र फेरीच्या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विनेश फोगटने यापूर्वी दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 2018 आशियाई व 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती विनेश फोगटवर विशेष लक्ष राहिल. पुरुषांच्या फ्रिस्टाईल विभागातून अमन सेरावत -57 किलो याने राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत रवि दाहियाला पराभूत केल्याने त्याच्याकडून या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;