जपानचा बॅडमिंटनपटू मोमोटा निवृत्त

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

जपानचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तसेच दोनवेळा विश्वविजेतेपद मिळविणारा केंटो मोमोटाने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली. काही मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या समस्येमुळे मोमोटाने 29 व्या वर्षी बॅडमिंटन क्षेत्राला निरोप दिला आहे. 2020 साली झालेल्या वाहन दुर्घटनेमध्ये मोमोटाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याच्या बॅडमिंटन कामगिरीवरही विपरीत परिणाम झाला होता. 2019 चे बॅडमिंटन वर्ष हे मोमोटाला सर्वात यशस्वी ठरले होते. त्याने या कालावधीत 11 स्पर्धा जिंकल्या होत्या. वाहन दुर्घटनेमध्ये त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर मोमोटाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाल्याने त्याने या क्षेत्रापासून अलिप्त होण्याचा निर्णय थोडा उशिरा घेतला. चीनमध्ये गेल्यावेळी झालेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत त्याने जपानचे प्रतिनिधीत्व केले होते. मोमोटाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरली. 2019 च्या कालावधीत मोमोटाने 73 पैकी 67 सामने सातत्याने जिंकले होते. बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात तो सध्या 52 व्या स्थानावर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;