नागरिकांची आर्थिक फसवणूक करून महागडय़ा मोबाईलची खरेदी
ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना सहज चुना लावयचा. मग फसवणुकीच्या पैशातून महागडे मोबाईल खरेदी करायचे आणि ते मोबाईल वेगवेगळ्या मध्यस्तांकरवी विकून पैसा कमवायचा. अशा प्रकारे पद्धतशीर झोल करून आपला खिस्सा भरणाऱया एका रॅटेकचा ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
वरळी येथे राहणारा संकेत बडे याची आर्थिक फसवणूक झाली होती. अहमदाबाद येथे जायचे असल्याने संकेत भाडय़ाने गाडी बघत होता. त्यासाठी तो गुगलवर सर्च करत असताना त्याला महादेव कार रेंटल डॉट कॉम हे संकेतस्थळ दिसले. त्या संकेतस्थळावर हवी ती गाडी तसेच आवश्यक माहिती भरल्यानंतर त्याने क्रेडीट कार्डाची माहिती भरल्यानंतर त्याला पेमेंट एरर असा संदेश आला. त्या वेळी समोरून संकेतच्या व्हॉट्सअपवर एक लिंक आली. ती लिंक डाऊनलोड करून त्यात सर्व माहिती भरल्यावरदेखील पुन्हा पेमेंट एररचा संदेश आला. थोडय़ा वेळाने संकेतच्या क्रेडीट कार्डवरून एक लाख 79 हजार 900 रुपये डेबिट झाल्याचा त्याला संदेश आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संकेतने ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अरविंद चंदनशिवे, पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नौशाद तांबोळी तसेच वाडते, गायकवाड, पगारे, पाटकर, सोनवणे, मुंडे, परब, अमोल पाटील या पथकाने तपास सुरू केला.
फिनिक्स मॉलमध्ये आयफोनची खरेदी
पथकाने माहिती काढली असता संकेतच्या पैशाने लोअर परळच्या फिनिक्स मॉल येथून आयफोन 15 प्रो मॅक्स हा मोबाईल खरेदी केला असल्याचे समजले. सेजान सय्यद या डिलेव्हरी बॉयने तो मोबाईल ताब्यात घेतला होता. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केल्यावर बीकेसीच्या भारत नगरात राहणाऱया सुरज निर्मल याला मोबाईल दिल्याचे कळले. सुरजकडे चौकशी केल्यावर त्याने त्याचा भाचा नारायण निर्मलकडे तो मोबाईल दिल्याचे सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List