मिंध्यांकडून आचारसंहितेचा भंग; एसटी गाडय़ांवर निवडणूक जाहिराती

मिंध्यांकडून आचारसंहितेचा भंग;  एसटी गाडय़ांवर निवडणूक जाहिराती

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचारासाठी सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांच्या मालमत्तांच्या वापरास मनाई केली आहे. तरीही मिंधे गटाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाडय़ांवर जाहिराती करून प्रचार केला जात आहे. अशा प्रकारे आचारसंहितेचा भंग करणाऱया मिंधे गटाच्या सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून भाजप आणि मिंधे गटाकडून सातत्याने आचारसंहितेचा भंग केला जात आहे. सार्वजनिक वाहनांवर प्रचाराच्या जाहिराती करण्यास बंदी आहे. तसे पत्रही निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे कॅबिनेट सचिव, मुख्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले आहे. मिंधे गटाकडून त्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

एसटीच्या अधिकाऱयांवरही कारवाई करा

बंदी असतानाही एसटीच्या अधिकाऱयांनी एक हजारांहून अधिक बसेस मिंधे गटाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी अवैधपणे वापरास परवानगी दिली आहे. एसटी महामंडळाच्या या बसेसवर मिंधे गट बॅनर लावून निवडणूक प्रचार करत आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो व धनुष्यबाण चिन्ह स्पष्टपणे दाखवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱयांचे हे कृत्य केवळ आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन करत नाही तर निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षता आणि अखंडतेला बाधा आणणारे आहे. याप्रकरणी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱयांवरही कारवाई करावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;