पवई हिरानंदानीजवळील आगीत 15 झोपडय़ा खाक

पवई हिरानंदानीजवळील आगीत 15 झोपडय़ा खाक

पवई हिरानंदानी येथील 90 फिट रोडजवळील झोपडपट्टीत आज सकाळी लागलेल्या आगीत 15 झोपडय़ा जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पवई हिरानंदानी 90 फूट रोडवरील झोपडपट्टी परिसरात सकाळी 11.15  वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. घटनास्थळी विद्युत वायरिंग, घरगुती वस्तू, कपडे, एलपीजी सिलिंडर, कागदपत्रे, लाकडी फर्निचर आदी साहित्यामुळे आग आणखी भडकली. आग पसरल्याने यात 12 ते 15 झोपडय़ांसह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने कार्य करीत एका तासाने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दल करीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;