आलिया भट्ट गुंतवणुकीतही हुशार, पाहा कुठे गुंतवणूक करुन ती कमावतेय करोडो रुपये

आलिया भट्ट गुंतवणुकीतही हुशार, पाहा कुठे गुंतवणूक करुन ती कमावतेय करोडो रुपये

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा नुकताच टाईम मासिकाच्या 100 प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आलिया सध्या चर्चेत आली आहे. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न उपस्थित होतोय की, आलिया भट्टने असे काय केले की तिला टाईम 100 मध्ये स्थान मिळाले आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला आलिया भट्ट काय व्यवसाय करते, तिचे नेट वर्थ किती, तिचे उत्पन्न आणि गुंतवणूक कुठे आहे ही प्रत्येक माहिती सांगणार आहोत. त्यामुळे आलिया फक्त  अभिनयच नाही तर व्यवसायात देखील अग्रेसर असल्याची गोष्ट कळेल.

आलिया भट्टचा व्यवसाय

आलिया भट्ट टाइम 100 मध्ये तिच्या समावेशामुळे चर्चेत आहे. केवळ ती एक अभिनेत्रीच नाही तर एक स्मार्ट बिझनेस वुमन देखील आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. पण जर आपण तिच्या व्यावसायिक गोष्टीबाबत जाणून घेतले तर कळेल की, तिचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.

आलिया भट्टने ओटीटी चित्रपट डार्लिंग्सद्वारे निर्माती म्हणून इंडस्ट्रीत एक नवीन इनिंग सुरू केली. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन्स असे आहे. आलिया अनेक व्यावसायिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. ज्यामध्ये ED-A-MAMMA चे नाव देखील समाविष्ट आहे.

मुलगी राहा कपूरच्या गरोदरपणात आलियाने D2C बिझनेस मॉडेलसह बिझनेस जगात प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिचे शेअर्स देखील आलियाच्या या लहान मुलांच्या कपड्याच्या कंपनीत सामील आहेत, ज्यामुळे ED-A-MAMMA चा टर्नओव्हर वेगाने वाढत आहे.

आलिया गुंतवणुकीत खूप हुशार

केवळ व्यवसायातच नाही तर गुंतवणुकीच्या बाबतीतही आलिया भट अतिशय हुशारीने काम करते. मिळालेल्या माहितीनुसार, आलियाने कानपूर IIT च्या D2C वेलनेस कंपनीच्या Phool.CO ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे.

असे म्हटले जाते की अभिनेत्रीला या ब्रँडच्या स्टार्टअपच्या काळापासूनच या ब्रँडमध्ये रस होता आणि तिने यात चांगली रक्कम गुंतवली आहे, ज्यामुळे तिला मोठा नफा होत आहे. यासोबतच आलिया भट्टची नायका आणि स्टाइल क्रॅकर ब्रँड्समध्येही गुंतवणूक आहे.

आलिया भट्टचे उत्पन्न

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टची अंदाजे एकूण संपत्ती ₹ 550 कोटींपेक्षा जास्त आहे. ती एका चित्रपटासाठी सुमारे ₹10-12 कोटी रुपये घेते. तिने ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून तब्बल $500,000 कमावले आहेत. तिने 2021 मध्ये तिची कंपनी Eternal Sunshine Productions लाँच केली. तिची पहिली निर्मिती 2022 मध्ये कॉमेडी/थ्रिलर चित्रपट डार्लिंग्स होती जी Netflix वर प्रदर्शित झाली. 23 फेब्रुवारी रोजी ॲमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या ‘पोचर’ची ती कार्यकारी निर्माती देखील आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;