दिलजितचं खासगी आयुष्य का आहे सिक्रेट? अभिनेत्याने सांगितला किस्सा

दिलजितचं खासगी आयुष्य का आहे सिक्रेट? अभिनेत्याने सांगितला किस्सा

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांझ याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. केवळ सर्वसामान्यच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा दिलजितच्या गायकीचे चाहते आहेत. नुकत्याच त्याच्या एका कॉन्सर्टमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दिलजितचा ‘अमर सिंग चमकीला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आपल्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होणारा दिलजित त्याच्या खासगी आयुष्याबद्दल कधीच बोलताना दिसत नाही. त्याने लग्न केलंय आणि त्याला एक मुलगासुद्धा आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होतेय. त्याबाबत आता ‘अमर सिंग चमकीला’ या चित्रपटातील दिलजितचा सहकलाकार अंजुम बत्रा याने खुलासा केला आहे. दिलजितने गुपचूप लग्न केलंय का किंवा तुला त्याच्या पत्नीबद्दल काही माहीत आहे का, असा प्रश्न अंजुमला विचारण्यात आला होता.

‘बॉलिवूड नाऊ’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अंजुम म्हणाला, “मी दिलजितच्या लग्नाबद्दल काही बोलू शकत नाही, कारण मला त्याविषयी काही माहितच नाही. पण दिलजितला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायला का आवडत नाही, हे त्याने शूटिंगदरम्यान सांगितलं होतं. काही वर्षांपूर्वी पंजाबमध्ये दिलजितच्या एका गाण्यावरून वाद झाला होता. लोकांनी त्याच्या घरासमोर निदर्शनं केली होती. तेव्हापासून तो त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतो. म्हणूनच तो त्याच्या कुटुंबीयांबद्दल सार्वजनिकरित्या काही बोलत नाही. या झगमगत्या विश्वापासून आपलं कुटुंब दूरच राहावं, असं त्याला वाटतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कियारा अडवाणीच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘गुड न्यूज’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने म्हटलं होतं की अक्षय कुमार, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजित दोसांझ या चौघांपैकी फक्त ती एकटीच अशी आहे, जिचं बाळ नाही. त्यामुळे दिलजितचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

दिलजित हा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. त्याने पंजाबीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचसोबत त्याची बॉलिवूड गाणीही प्रचंड हिट आहेत. जामनगरमध्ये पार पडलेल्या अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात दिलजितने परफॉर्म केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;