आम्हाला मूल नको…; बेबी प्लॅनिंगच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरेचं उत्तर
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या कोणत्या चित्रपट किंवा मालिकेत झळकत नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. 2017 मध्ये तिने अभिषेक जावकरशी लग्न केलं. सोशल मीडियावर आणि मुलाखतींमध्येही अनेकदा प्रार्थनाला गरोदरपणाविषयी प्रश्न विचारले जातात.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने 'बेबी प्लॅनिंग'विषयीच्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, "मला आणि माझ्या पतीला प्राणी खूप आवडतात. त्यामुळे मूल नको, असं आम्ही ठरवलं होतं. आमच्या घरी असलेले प्राणी हीच आमची मुलं आहेत."
"या सर्व प्राण्यांची आम्ही खूप काळजी घेतो. त्यांचा सांभाळ आम्ही पोटच्या मुलांसारखंच करतो. मूल होऊ न देण्याचा आमचा निर्णय मोठा होता. पण यात आमच्या कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला. त्यांनी आम्हा दोघांना समजून घेतलं", असं तिने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List