तुझ्याशिवाय आयुष्य..; ‘तारक मेहता..’ फेम जेनिफर मिस्त्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

तुझ्याशिवाय आयुष्य..; ‘तारक मेहता..’ फेम जेनिफर मिस्त्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफरची छोटी बहीण डिंपलचं निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून ती आरोग्याच्या समस्यांचा सामना करत होती. अखेर 13 एप्रिल रोजी तिची प्राणज्योत मालवली. बहिणीच्या निधनानंतर जेनिफरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. प्रकृती खालावल्याने डिंपलला दहा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती व्हेंटिलेटरवर होती. खाजगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडत नसल्याने डिंपलच्या कुटुंबीयांनी तिला सरकारी रुग्णालयात हलवलं होतं. वयाच्या 45 व्या वर्षी डिंपलने अखेरचा श्वास घेतला.

बहिणीच्या आठवणीत जेनिफरने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘माझी प्रेमळ बहीण डिंपल, तुझ्याविना आयुष्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. लव्ह यू, मिस यू. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद कसा लुटला पाहिजे, हे तू आम्हाला शिकवलंस. परिस्थिती कशीही असो, तू नेहमीच हसत राहिलीस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जेनिफर तिच्या खासगी आयुष्यात सतत विविध समस्यांचा सामना करत असल्याचं म्हटलंय. 2022 मध्ये भावाच्या निधनानंतर ती माहेरच्या सात मुलींची जबाबदारी उचलत असल्याचं तिने सांगितलं. या समस्यांदरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यासोबत कायदेशीर लढाई सुरू आहे.

‘तारक मेहता..’ ही मालिका सोडल्यानंतर जेनिफरला अद्याप कोणती चांगली ऑफर मिळाली नाही. तिने मालिकेच्या निर्मात्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयाने जेनिफरच्या बाजूने निर्णय दिला असून असितकुमार मोदी यांना 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जेनिफरने 15 वर्षांपासून ‘तारक मेहता..’ या मालिकेत काम केलं. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने ही मालिका सोडली. निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली होती, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;