मुलामधील अरबाजचा हा गुण मला अजिबात आवडत नाही; मलायका स्पष्टच बोलली

मुलामधील अरबाजचा हा गुण मला अजिबात आवडत नाही; मलायका स्पष्टच बोलली

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान याने त्याच्या मित्रांसोबत ‘डंब बिर्याणी’ हा पॉडकास्ट सुरू केला आहे. या पॉडकास्टच्या पहिल्याच एपिसोडमध्ये त्याने पाहुणे म्हणून वडील अरबाज आणि काका सोहैल यांना बोलावलं होतं. या दोघांनी अरहान आणि त्याच्या मित्रांसोबत जबाबदाऱ्या, नाती आणि इतर मुद्द्यांवर मोकळेपणे गप्पा मारल्या. आता दुसऱ्या एपिसोडमध्ये अरहानची आई मलायका अरोराने हजेरी लावली आहे. अरहानने त्याच्या आईसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी दोघंजण ‘ट्रुथ ऑर स्पाइस’ हा खेळसुद्धा खेळले. या खेळादरम्यान अरहानने आईला एक प्रश्न विचारला. “माझ्यात वडिलांसारखे असे कोणते सकारात्मक आणि नकारात्मक गुण आहेत”, असं तो मलायकाला विचारतो.

मुलाच्या प्रश्नावर उत्तर देताना मलायका म्हणते, “तुझी चालण्या-बोलण्याची पद्धत आणि व्यवहार अगदी तुझ्या वडिलांसारखेच आहेत. तुम्ही दोघं इतके समान आहात, की कधीकधी मीच थक्क होते. तुझी कानाला हात लावण्याची सवय आणि इतर बऱ्याच गोष्टी वडिलांसारख्या आहेत.” हे ऐकून अरहान विचारतो, “फक्त यामुळे मी वडिलांसारखा आहे का?” तेव्हा मलायका पुढे सांगते, “नाही, हे खरंय. तुझ्या सगळ्या चालण्या-बोलण्याच्या सवयी तुझ्या डॅडसारख्याच आहेत. या काही आकर्षक सवयी नाहीत, पण ते अगदी अरबाजसारखे आहेत. त्याचप्रमाणे तो काही गोष्टींबाबत खूप स्पष्ट विचार करतो. ते गुणसुद्धा तुझ्यात आहे. पण त्याचवेळी तू सुद्धा त्याच्यासारखा लगेच निर्णय घेत नाहीस. हा गुण मला अजिबात आवडत नाही. तू तुझ्या शर्टाचा रंगसुद्धा लगेच निवडत नाहीस, काय खायचं ते लगेच ठरवत नाहीस, सकाळी कितीला उठायचं हे तू ठरवत नाहीत. या गोष्टी वडिलांसारख्याच आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by dumb biryani (@dumbbbiryani)

आईने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर अरहान तिला म्हणतो, “माझं रुटीन खूप चांगलं आहे.” याचं श्रेय मलायका तिच्याकडे घेते. “अर्थात तुझं रुटीन चांगलं आहे. कारण हा गुण तुला माझ्याकडून मिळाला आहे”, असं म्हणत ती स्वत:चीच पाठ थोपटते. मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे. अरबाजने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. तर मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;