जालन्यात प्रेम प्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जालन्यात प्रेम प्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जालन्यात प्रेम प्रकरणातून तरुणाला काही इसमांनी 14 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मारहाण केली होती. यात वीरेंद्र महेंद्र शेळुते रा. ईंदेवाडी जालना यांना बेदम मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणाचा बुधवारी 17 एप्रिल रोजी रात्री उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी आज गुरूवारी या तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कदीम जालना पोलीस ठाण्यात आणला आणि जो पर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला होता.

याप्रकरणी मयताचा भाऊ विजेंद्र शेळूते यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली. मयताच्या भाऊ विजेंद्र यांच्या फिर्यादी नुसार मयत विरेंद्र याचा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली. नेमकी घटना कोठे घडली याचा शोध लागला नसून या प्रकरणात पाच आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली. यांनतर मयत तरुणाच्या नातेवाईकांनी मयत इसमाचा मृतदेह ताब्यात घेतलाय. याप्रकरणी 5 संशयित आरोपींविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;