मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांची क्लिनिंग मशीन, शरद पवारांचा घणाघात

मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांची क्लिनिंग मशीन, शरद पवारांचा घणाघात

देशाची सत्ता पुन्हा मोदी यांच्या हातात द्यायची नाही अशी मनःस्थिती सध्या जनतेत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना पक्षात घेऊन स्वच्छ करतात. मोदी यांचे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करण्याचे क्लिनिंग मशीन झाले आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती अप्पासो जगदाळे व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्यासह त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या वेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, तालुक्यातील एका व्यक्तीला मी तिकीट दिले. निवडून आणले, आमदार केले, मंत्री केले. ते समाजातील लोकांच्या विकासासाठी काही करेल असे वाटले होते. परंतु त्याने स्वतःचा विकास केला अशी टीका पवार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली. झालेली चूक या विधानसभे वेळी दुरुस्त करण्याची  संधी आली असल्याचे ते म्हणाले.

देशाचे पंतप्रधान माझे बोट धरून राजकारणात आलो म्हणतात यावर कसा विश्वास ठेवायचा? अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. अनेक आश्वासने त्यांनी दिली. परंतु त्याची पूर्तता त्यांनी केली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;