आयपीएल सामन्यावर बेटिंग करणारा अटकेत 

आयपीएल सामन्यावर बेटिंग करणारा अटकेत 

आयपीएलच्या कोलकाता आणि राजस्थान सामन्यावर बेटिंग करणाऱयाला बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. निखिल सिंग असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

मंगळवारी राजस्थान आणि कोलकाता हा सामना खेळवला गेला होता. त्या सामन्यावर एकजण बेटिंग करत असल्याची माहिती बांगूर नगर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक भास्कर कदम, सहाय्यक निरीक्षक विवेक तांबे, राहुल भदारगे आणि पथक चिंचोली बंदर परिसरात गेले. पोलिसांचे पथक एका पॅफेमध्ये गेले. त्या पॅफेमध्ये टीव्ही सुरू होता. टीव्हीवर राजस्थान आणि कोलकाता हा सामना सुरू होता. निखिल हा मोबाईलवरून एक वेबसाईट सर्च करत होता. त्या वेबसाईटबाबत निखिलला पोलिसांनी विचारणा केली. ते अॅप्स क्रिकेट बेटिंगसाठी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

त्या अॅप्समध्ये काही पॉईंट दिसत होते. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये क्रिकेट बेटिंगबाबत काही चॅट्स होते. पोलिसांनी निखिलला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाईल जप्त केला. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. निखिलला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;