पुतण्याचा हलगर्जीपणा काकाच्या जिवावर बेतला

पुतण्याचा हलगर्जीपणा काकाच्या जिवावर बेतला

पुतण्याने पार्क केलेली बस सुरू करून ती पुढे नेत असताना आपल्या काकाला चिरडल्याची घटना काळाचौकी परिसरात घडली. गाडीखाली काका झोपलेले असल्याची खातरजमा न करता त्यांच्या अंगावर त्याने बस चढवली. यात दुर्दैवाने गंभीर जखमी झालेल्या काकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गोकुळदास नवतुरे (22) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

भरत नवतुरे यांचा या दुर्दैवी घटनेत अंत झाला. भरत आणि त्यांचा पुतण्या गोकुळदास हे एकत्रच वाशिंद येथे राहत होते. शिवाय दोघेही काळाचौकी येथील मोहम्मद हातिम दुधवाला यांच्या मोहम्मद टुर्स अँड ट्रव्हल्स या ट्रान्सपोर्टमध्ये काम करत होते. शिवडी येथील पालिकेच्या पार्ंकगमध्ये कंपनीच्या गाडय़ा पार्क केलेल्या होत्या. 15 तारखेच्या सकाळी गोकुळदास बस सुरू करून पुढे नेत असताना मागच्या चाकाखाली भरत आले. हे कळताच त्याने बस मागे घेऊन भरत यांना बाजूला काढले. मात्र यात भरत यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ केईएम इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना भरत यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी भरत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गोकुळदास याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;