‘सामना न्यूज एक्प्रेस’ची हनुमान उडी! वेळ वाचणार; बातमीही नाही चुकणार, मराठी न्यूजसाइटमधील पहिला प्रयोग

‘सामना न्यूज एक्प्रेस’ची हनुमान उडी! वेळ वाचणार; बातमीही नाही चुकणार, मराठी न्यूजसाइटमधील पहिला प्रयोग

न्यूज वेबसाइटच्या दुनियेत दैनिक ‘सामना’ची डिजिटल आवृत्ती Saamana.comने कोटय़वधी पेज ह्यूज आणि युझर्ससह अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या आठ वर्षात मोठ मोठे टप्पे गाठले असून आता ‘Saamana News Express’ द्वारे जणू हनुमान उडीच घेतली आहे. ज्यावर वाचकांच्या पसंतीची मोहर उठत आहे.

धावपळीच्या जगात संपूर्ण बातमी वाचणं अशक्य होऊन बसलं आहे. सोशल मीडियावरील रील्समुळे आता बातम्या देखील चटकन दिसतील, झटपट वाचता येतील अशा तऱहेनंच असल्यास वाचकांच्या पसंतीस उतरतात. त्यासोबतच ‘फेक न्यूज’ देखील मोठी समस्या आहे. अशावेळी खरी बातमी, ताज्या घडामोडी एका नजरेत डोळ्याखालून घालण्यासाठी मराठी वेबसाइटच्या दुनियेत सर्वात पहिल्यांदा Saamana.com घेऊन आलं आहे ‘Saamana News Express’. मराठी वेबसाइटच्या दुनियेत हा पहिला प्रयोग असून काही दिवसातच नेटकऱयांच्या पसंतीस उतरला असून काही लाखात पेजह्यूज पोहोचले आहेत. दैनिक सामनाची डिजिटल एडिशन Saamana.com वर आता Saamana News Express ठळक बातम्यांच्या सेक्शनमध्ये दिसते. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अग्रलेख, ताज्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या एका नजरेत काही क्षणात वाचता येतात. तुम्हाला महत्त्वाची वाटलेली बातमी, व्हिडीओ सविस्तर पाहायचे असल्यासच तुम्ही त्यावर क्लिक करून संपूर्ण बातमी वाचू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;