इंडिया-महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांची आज बैठक

इंडिया-महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांची आज बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया-महाविकास आघाडीच्या दक्षिण-मध्य मुंबई लोकसभेतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱयांची बैठक गुरुवार, 18 एप्रिलला सकाळी 10 वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला पदाधिकारी ते शाखाप्रमुख, वॉर्ड अध्यक्षांपर्यंत सर्वजण उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण -मध्य मुंबई मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी दादर येथे होणाऱया बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, अनिल देसाई, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन, रिपाइं (ए) गटाचे दीपक निकाळजे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युवा रिपब्लिकन सागर संसारे, पीआरपीएमचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे, शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर, समाजवादी गणराज्य पक्षाचे आमदार कपिल पाटील, भाकपचे मुंबई सचिव मिलिंद रानडे, भाकप (मार्क्सवादी) डॉ. एस. के. रेगे, कॉम्रेड अजित पाटील, शिवसेना लोकसभा समन्वयक रवींद्र मिर्लेकर, उपनेत्या विशाखा राऊत, उपनेते सुबोध आचार्य, मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर, काँग्रेसचे गणेश यादव, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, काँग्रेसचे राजन भोसले, अमित शेट्टी, वीरेंद्र उपाध्याय, हुकूमराज मेहता, शेकापचे राजू कोरडे, आपचे संदीप कटके, विभागप्रमुख महेश सावंत, प्रमोद शिंदे, विभाग संघटक श्रद्धा जाधव, पद्मावती शिंदे, राष्ट्रवादीचे आरीफ सय्यद, समाजवादी पक्षाच्या रुक्साना सिद्धिकी आदी उपस्थित राहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;