जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाची स्थगिती, मिंधे सरकारला चपराक

जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाची स्थगिती, मिंधे सरकारला चपराक

शीव कोळीवाडा, गुरू तेग बहादूर (जीटीबी) नगर येथील 25 इमारती व 1200 घरांचा क्लस्टर पुनर्विकास करण्याच्या मिंधे सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. याने मिंधे सरकारला चांगलीच चपराक बसली आहे.

क्लस्टर पुनर्विकासाचा निर्णय पॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. म्हाडाकडून हा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याविरोधात लखानी हाऊसिंग कॉर्पोरेशन पंपनीने याचिका केली आहे. न्या. गौतम पटेल व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यास म्हाडाने वेळ मागितला. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी 3 मे 2024पर्यंत तहकूब केली.

कंपनीचा युक्तिवाद

येथील इमारतींचा पुनर्विकास करावा, अशी मागणी कोणत्याच सोसायटीने राज्य शासन किंवा म्हाडाकडे केली नव्हती. काही सदस्यांच्या मागणीनुसार क्लस्टर पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे निर्णय घेता येत नाही, असा युक्तिवाद पंपनीने केला.

म्हाडाचा दावा

येथील काही सदस्यांनी एकत्र येऊन पुनर्विकासाची मागणी केली. त्याची दखल घेत क्लस्टर पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा म्हाडाचे वकील प्रकाश लाड यांनी केला. यासाठी ई-टेंडरद्वारे निविदा मागवल्या जाणार आहेत. पुढील सुनावणीपर्यंत याबाबत कोणतीच प्रक्रिया केली जाणार नाही. क्लस्टरच्या निर्णयाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती देऊ नये, अशी विनंती अॅड. लाड यांनी केली.

न्यायालयाचे निरीक्षण

सोसायटीमार्फतच पुनर्विकासाचा प्रस्ताव दिला जातो. क्लस्टर संदर्भात पुढील काहीही प्रक्रिया केली जाणार नाही, अशी हमी म्हाडाने देण्यापेक्षा आम्हीच याला अंतरिम स्थगिती देतो, असे न्या. पटेल यांनी स्पष्ट केले.

 काय आहे प्रकरण

इमारती धोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले व त्या पाडल्या. येथील काही सोसायटय़ांनी पुनर्विकासासाठी पंपनीकडे संपर्क केला. पुनर्विकासासाठी पंपनीची नियुक्ती करण्यात आली. तरीदेखील या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाकडून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;