स्कॉर्पिओ उलटून चौघेजण ठार; देऊळगाव राजाजवळ झाला अपघात

स्कॉर्पिओ उलटून चौघेजण ठार; देऊळगाव राजाजवळ झाला अपघात

देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी जवळ आज 17 एप्रिलच्या संध्याकाळी भीषण अपघात झाला. लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाची स्कॉर्पिओ वाहन उलटल्याने झालेल्या अपघात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ठार झालेले चौघेही चिखली तालुक्यातील अंबाशी येथील आहेत.

प्राप्त माहितीनुसार चिखली तालुक्यातील आंबाशी येथील 8 जण स्कॉर्पिओ वाहनाने जालना येथे जात होते. यावेळी दगडवाडी येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात वसंत देशमुख (45) अशोक भीमराव नायक (65), विलास जयवंत देशमुख (63) हे जागीच ठार झाले तर योगेश लक्ष्मण देशमुख या चालकाचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला. गोपाल आबाराव देशमुख (43), शालीनी देशमुख (34), मिरा संजय देशमुख (40), अक्षरा संदीप देशमुख (19) यांच्यावर देऊळगावराजात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;