विखेंच्या बॉडीगार्डकडून लंकेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

विखेंच्या बॉडीगार्डकडून लंकेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोकसभा निवडणूकीतील उमेदवार नीलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरु आहे. दरम्यान या यात्रेत सहभागी झाल्याच्या रागातून खा. डॉ. सुजय विखे यांचा बॉडीगार्ड गौरव सुधाकर गर्जे याने सहकाऱ्यांच्या मदतीने शहादेव भानुदास पालवे यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. ही घटना ५ एप्रिल रोजी घडली मात्र पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास तयार नव्हते. यानंतर शहादेव यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगर येथील पोलिसांनी शहादेव यांचा जबाब नोंदविला. जबाब नोंदविल्यानंतरही गुन्हा दाखल होत नव्हता. शहादेव यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर 11 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीस फिर्यादीची प्रत देण्यासही टाळाटाळ करण्यात आली होती. अखेर न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीची प्रत उपलब्ध करून दिली. यासंदर्भात शहादेव पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे की,5 एप्रिल रोजी सायंकाळी  6 वाजण्याच्या सुमारास शहादेव हे चिचोंडी येथून नीलेश लंके यांची रॅली संपल्यानंतर दुचाकीवरून शिराळ मार्गे मजले चिंचोली येथे जात होते. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून गौरव सुधाकर गर्जे तसेच ओमीनी गाडीतून रामेश्‍वर प्रकाश पालवे, ज्ञानेश्‍वर प्रकाश पालवे, सर्व रा. कोल्हार कोल्हुबाईचे ता. पाथर्डी तसेच इतर दोन अज्ञात इसम हे शहादेव यांच्याजवळ आले.

गौरव गर्जे याने शहादेव यांच्या दुचाकीस त्याची दुचाकी आडवी लावून त्यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. ‘तू नीलेश लंके याच्या रॅलीत का फिरतोस ? मी विखेचा बॉडीगार्ड आहे हे माहीती नाही का ? असे विचारत शहादेव यांना मारहाण केली.तसेत गौरव गर्जे आणि त्यांच्या सहकार्यांनी शहादेव यांच्या गळयातील सोन्याची चैन ओरबडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या डोक्यात दगड मारला आणि खिशातील 17 हजार 750 रूपयांची रोकड काढून घेतली आणि रॉडने मारहाण करीत गौरव गर्जे याने तुला मारून टाकू अशी धमकी देऊन तेथून पळ काढला.

मारहाणीनंतर जखमी शहादेव हे नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. शहादेव यांच्या फिर्यादीनंतर सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;