Lok Sabha Election 2024 : प्राणघातक हल्ल्याचा आरोपी कुंडलिक खांडे पंकजा मुंडेंच्या प्रचारात

Lok Sabha Election 2024 : प्राणघातक हल्ल्याचा आरोपी कुंडलिक खांडे पंकजा मुंडेंच्या प्रचारात

आपल्याच गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल असलेला मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याचा बीडचे तपास तरबेज पोलीस दोन आठवड्यांपासून शोध घेत आहेत. खांडेच्या शोधासाठी पोलिसांची पथके राज्यभरात पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र काखेत कळसा अन् गावाला वळसा असेच पोलिसांचे झाले आहे. कुंडलिक खांडे हा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात दंग असून, रॅली, सभांमध्ये तो दिसून येत आहे. गृहखात्याचे संरक्षण मिळाल्यामुळेच खांडे राजरोस फिरत असल्याने बीडकरांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे.

दहा दिवसांपूर्वी मिंधे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे हे म्हाळसजवळा गावाकडे जात असताना खंडेश्वरी मंदिराजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी त्यांना दुसर्‍या रुग्णालयात पाठवण्यात आले. ज्ञानेश्वर खांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिंधे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह अकरा जणांविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
गुन्हा दाखल झाल्यापासून बीड पोलीस कुंडलिक खांडेसह अकरा जणांचा शोध घेत आहेत. कुंडलिक खांडे यांच्या शोधासाठी राज्यभरात पोलीस पथके रवाना करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र या पथकांनी कुठे पर्यटन केले माहिती नाही, पण एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

कुंडलिक खांडे मुंडेंच्या व्यासपीठावर
कुंडलिक खांडेसह अकरा जणांच्या शोधासाठी पोलीस भरउन्हात वणवण करत आहेत. मात्र बगल में बच्चा… अशी अवस्था पोलिसांची झाली आहे. कुंडलिक खांडे हा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात दंग आहे. मुंडे यांच्यासोबत ठिकठिकाणी व्यासपीठावर त्याला पाहण्यात आले. प्राणघातक हल्ल्यातला आरोपी राजरोसपणे भाजपच्या व्यासपीठावर वावरताना दिसत असूनही पोलिसांना मात्र सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;