Lok Sabha Election 2024 : अजितदादांसाठी ग्राऊंडवर फिरतेय संघाची यंत्रणा! रोहित पवार यांचा घणाघात
मतदारांशी संवाद साधताना महायुतीच्या उमेदवारांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. बावनकुळे, मुनगंटीवार आणि आता इंदापूरच्या सभेत बोलत असताना अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या अजित पवार यांच्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
शेवटी सत्ता आणि स्वार्थासमोर विचारधारा मात्र गौण ठरते, असं म्हणत रोहित पवार यांनी ट्वीटरवर (x) अजित पवारांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही टिकेचं लक्ष्य केलं आहे. “स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या ‘नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या’ बंगल्यावर आजकाल संघाच्या (RSS) लोकांच्या बैठकी होत आहे. यांस वैचारिक दिवाळखोरी म्हणावी का?,” असे ट्विट करत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासह आरएसएसच्या विचारधारेवर टीका केली आहे.
…तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत फूट पडणार? अजित पवार गटातील नेत्याचा खळबळजनक दावा
“आधी दादांवर नाना प्रकारचे आरोप करणारी संघाची ग्राऊंडवर प्रचार करणारी यंत्रणा आज मात्र दादांसाठी ग्राऊंडवर फिरत आहे. याचा अर्थ संघाची यंत्रणा तेव्हा खोटा प्रचार करायची असा घ्यायचा की भाजप वॉशिंग मशीनचा हा परिणार म्हणायचा? असो, शेवटी सत्ता आणि स्वार्थासमोर विचारधारा मात्र गौण ठरते,” असे म्हणत रोहित पवार यांनी संघावर आणि भाजपवर घणाघात केला आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या ‘नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या’ बंगल्यावर आजकाल संघाच्या लोकांच्या बैठकी होत आहेत. यांस वैचारिक दिवाळखोरी म्हणावी का? आधी दादांवर नाना प्रकारचे आरोप करणारी संघाची ग्राऊंडवर प्रचार करणारी यंत्रणा आज मात्र दादांसाठी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 17, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List