प्रेग्नंसी आणि प्लास्टिक सर्जरीबाबत परिणीतीने सांगितलं सत्य!
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या प्रदर्शित झालेल्या ‘चमकिला’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित चमकिला या चित्रपटात परिणीती आणि दिलजीत दोसांझची जोडी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात परिणीतीने अमरजोतची भूमिका साकारली असून दिलजीत अमर सिंग चमकीलाच्या भूमिकेत दिसला आहे. परिणीतीने या भूमिकेसाठी 15 किलो वजन वाढवले होते. मात्र तिच्या या नव्या लूकनंतर परिणीती गरोदर असल्याच्या अफवा उडू लागल्या. याशिवाय तिची प्लास्टिक सर्जरी झाल्याची अफवाही वाऱ्यासारखी पसरली. मात्र या सगळ्यावर परिणीतीने पडखर उत्तर दिले आहे.
परिणीती चोप्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. परिणिती म्हणाली, “इम्तियाज सरांनी मला 15 किलो वजन वाढवण्यास सांगितले होते आणि चेहऱ्यावर मेकपही करू नकोस असे त्यांनी मला सांगितले होते. ‘चमकिला’मध्ये मला बेरुप दिसायचे होते. त्यामुळे आपल्या चित्रपटासाठी मी हे नक्की करेन असे मी त्यांना सांगितले होते. अनेकांनी तिला सांगितले होते की, वजन वाढवण्याच्या निर्णयामुळे तुझे करियर संपेल. मात्र, मी विद्या बालनला आपली प्रेरणा मानून असे करण्याचा निर्णय घेतला. विद्याने ‘द डर्टी पिक्चर’मध्येही असेच केले होते. ‘चमकिला’चे शूटिंग जवळपास दोन वर्षे चालले. त्यामुळे यावेळेत मी अनेक चित्रपट गमावले. यादरम्यान माझ्या वाढलेल्या वजनामुळे माझ्या प्रेग्नन्सीबद्दल आणि प्लास्टिक सर्जरीच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र असं काहीही नसून तो चित्रपटाचा एक भाग होता, असे परिणीतीने स्पष्टच सांगितले.
परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ यांचा बहुप्रशिक्षित चित्रपट 12 एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पंजाबचा एल्विस प्रेस्ली म्हणून ओळखला जाणारा गायक अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List