राजदच्या कार्यालयात निवडणूक आयोगाची छापेमारी

राजदच्या कार्यालयात निवडणूक आयोगाची छापेमारी

बिहारच्या चार लोकसभा जागांवर पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणार आहे. बुधवारी या निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्या दरम्यानच, बिहारच्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाने छापेमारी केली आहे.

औरंगाबाद येथे 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी औरंगाबाद येथील राजदच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. आयोगाच्या भरारी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे.

सुमारे तीन ते चार तास चाललेल्या या छापेमारीनंतर कार्यालयातून 50 हजारांची रोख रक्कम आणि प्रचाराचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. ही छापेमारी कुणाच्यातरी इशाऱ्याने केली जात असल्याचा आरोप राजदच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;