सलमानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर विवेक ओबेरॉयचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; चाहत्यांनी घेतली शाळा

सलमानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर विवेक ओबेरॉयचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; चाहत्यांनी घेतली शाळा

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली. यात कोणालाही दुखापत झाली नसली तर सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा सलमानची भेट घेत सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोईने स्वीकारली आहे. लॉरेन्स बिष्णोईने याआधीही अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. काळवीट शिकार प्रकरणानंतर बिष्णोई गँग सलमानवर नाराज असून त्यांना त्याचा सूट घ्यायचा आहे. यादरम्यान आता अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विवेक हा बिष्णोईल समाजाचं कौतुक करताना दिसत आहे.

विवेकचा हा व्हिडीओ बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये तो म्हणतोय, “या जगात फक्त एकच समुदाय आहे, बिष्णोई समुदाय. जिथे हरीण किंवा काळवीट मेल्यास त्याच्या पिल्लाला बिष्णोई समाजाच्या महिला आपल्या पोटच्या बाळाप्रमाणेच दूध पाजतात. आपल्या स्वत:च्या बाळाप्रमाणे त्याची काळजी घेतात.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमानचे चाहते विवेकला ट्रोल करत आहेत. ‘सलमानशी असलेल्या शत्रुत्वामुळे विवेक बिष्णोई समाजाचं कौतुक करतोय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि विवेक ओबेरॉय हे दोघं सलमानचे शत्रू आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sagar (@sagarcasm)

सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. दोघांनाही गुजरातमधील भूज शहरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहपोलीस (गुन्हे) आयुक्त लखमी गौतम यांनी दिली. गोळीबारानंतर आरोपींनी मोबाईल आणि पिस्तूल फेकले असून त्यासाठी लवकरच पोलिसांचं पथक गुजरातला जाणार आहे.

विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावं असून त्यातील पाल याने अद्ययावत पिस्तुलाने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. एक आरोपी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात होता. त्यामुळे याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;